राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या हालचालींना वेग; फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार अचानक दिल्ली दौऱ्यावर…! मोदी शहांच्या भेटीत काय ठरणार ?

---Advertisement---

 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या मोठ्या हालचाली या घडू लागले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनिता पवार या आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आला असून दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार गटाकडून सध्या जोरदार हालचाली सुरू असल्याचा समजत आहे. विविध बैठकांचा सत्र देखील यामुळे आयोजित करण्यात आलेला आहे. सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. तीनही नेत्यांमध्ये तब्बल 70 मिनिट ही बैठक झाली आहे. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे नेमका काय निर्णय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान आज मुंबईत सुनेत्रा पवार येणार आहेत, आणि मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तसंच होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील त्या हजेरी लावणार आहेत. मुंबईतली सर्व काम झाल्यानंतर आजच सुनेत्रा पवार ह्या दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात त्या राहणार आहेत. आणि उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीत सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल चर्चा करणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी दिल्ली दौऱ्यावर गेलेले होते. आणि त्यानंतर आज मंगळवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी विलनीकरणाचा हालचालींना वेग आलं असल्याचं स्पष्ट होतंय. राष्ट्रवादीच विलीनीकरण होणार का? की राष्ट्रवादीचे दोन्ही गट स्वातंत्र अस्तित्व ठेवून एनडीएला पाठिंबा देतील ? या सर्व संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात नेमकं काय घडेल ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---