राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे उद्या जळगावात

---Advertisement---

 


जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेत शीतयुध्द सुरू आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युतीचा विषयनंतर आधी मुलाखती असा कार्यक्रम सुरू केला आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे हे जळगाव दौऱ्यावर येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय पातळीवर आरक्षणाची प्रक्रिया आटोपली आहे. आता मतदार यादीचा कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी देखिल निवडणुकीच्या कामाला गती दिली आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत सध्या कलह सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून स्वबळाचे नारे दिले जात असल्याने महायुतीतील तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने सावध पावित्रा घेतला आहे. भाजपा आणि शिवसेना पक्षातील शीतयुध्द लक्षात घेता दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने थेट मुलाखतीच्या प्रक्रियेला सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

संपर्क मंत्री कोकाटे घेणार मुलाखती

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे हे शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहे. ॲड. कोकाटे यांचा दौरा दोन दिवसीय राहणार असून यात ते ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अर्ज भरून घेणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय पवार, उमेश नेमाडे, शहराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---