---Advertisement---
जळगाव : विवाहोच्छुक तरुणाकडे तरुणी त्याच्याकडे आली. नववधु म्हणून आठ दिवस त्याच्याकडे थांबली. त्यानंतर अडीच लाखाची रोकड घेत या वधुने पलायन केले.
३१ वर्षीय तरुण अमळनेर तालुक्यातील रहिवासी असुन तो हल्ली सुरत येथे वास्तव्य करत आहे. हा तरुण विवाहोच्छुक होता. त्यानुसार अनोळखी पुरषाच्या मध्यस्थीने विवास्थळ शोध सुरू होता. मध्यस्थीने स्थळ आणले. दुर्गा गजानन थाटोड (रा. गायेगाव, ता. अकोला), नंदा पूर्ण नाव गाव माहित नाही. तसेच मध्यस्थी (एजंट) असे तिघे तरुणाकडे सुरत येथे आले. दुर्गा हिला तरुणाला दाखविले. तरुण आणि तरुणीने एकमेकांना पाहिल्यानंतर दोघांनी लग्नाला सहमती दिली.
त्यानुसार दुर्गा तरुणाच्या घरी थांबली. त्याचा विश्वास संपादन केला. आठ दिवसानी अडीच लाखाची रोकड घेत या नववधूने पलायन केले. तरुणाने तिचा सर्वत्र शोध घेतला असता तपास लागला नाही. मध्यस्थी आणि नववधू सोबत आलेली नंदा या दोघांशी तरुणाने संपर्क साधला असता होऊ शकला नाही. आठ दिवस राहुल विश्वास संपादन केला. त्यानंतर पैसे घेऊन तरुणी पळुन केली.
लग्नासाठी अडीच लाख घेऊन आठ दिवस सासरी थांबली. व पतीला काही एक न सांगता घरातून निघुन गेली व फसवणूक केली. अशा तक्रारीवरुन अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांवर पो.नि. दत्तात्रय निकम यांच्या समोर याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार विनोद भोई हे तपास करीत आहेत.









