घरमालक आणि भाडेकरूंसाठी महत्वाची बातमी; भाडेकरूंसाठी १ एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार….!

---Advertisement---

 

१ एप्रिल २०२६ पासून घरभाडे भत्ता (HRA) क्लेम करणाऱ्या करदात्यांसाठी नवीन नियम लागू होणार असून, यामुळे करसवलत घेण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कडक होणार आहे. नवीन आयकर अधिनियम २०२५ अंतर्गत हे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत.

नव्या नियमांनुसार, HRA क्लेम करताना करदात्यांना घरमालकाशी असलेले नाते स्पष्टपणे जाहीर करावे लागणार आहे. यासाठी सरकारने नवीन फॉर्म १२४ सादर केला असून, या फॉर्ममध्ये घरमालकाची सविस्तर माहिती देणे अनिवार्य असेल.

या माहितीमध्ये घरमालकाचे पूर्ण नाव, पत्ता, पॅन क्रमांक आणि करदात्याशी असलेले नाते यांचा समावेश असेल. यापूर्वी HRA क्लेम करताना नातेसंबंध जाहीर करणे आवश्यक नव्हते, त्यामुळे अनेकदा खोट्या भाडेपावत्या दाखवून करसवलत घेतली जात होती.

नवीन नियमांमुळे अशा गैरप्रकारांवर आळा बसण्याची शक्यता आहे. विशेषतः नातेवाईकांच्या नावावर भाडे दाखवून कर वाचवण्याचे प्रकार आता सहज तपासता येणार आहेत, असे कर तज्ज्ञांचे मत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, कुटुंबातील सदस्यांना भाडे देण्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, अशा व्यवहारांसाठी वैध भाडेकरार असणे आवश्यक आहे. तसेच भाडे रोख स्वरूपात न देता बँकेद्वारे देणे आणि घरमालकाने ते उत्पन्न म्हणून आयकर विवरणपत्रात दाखवणे बंधनकारक राहणार आहे.

या बदलांमुळे HRA क्लेम प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध होणार असून, करदात्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---