---Advertisement---

तृतीयपंथीय बंद्याकरिता उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक जळगावात !

by team
---Advertisement---

जळगाव :  जिल्हा कारागृहात तृतीयपंथीय बंद्याकरिता उत्तर महाराष्ट्रातील पहिलं बॅरेक बांधण्यात आले आहे. या नवीन बॅरेकचे उद्घाटन राज्याचे करागृह विशेष महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

जळगाव जिल्हा कारागृह वर्ग-२ मध्ये पुरुष बंद्याकरिता दोन नवीन बॅरेक बांधण्यात आले आहेत. या कारागृहाची बंदी क्षमता २०० इतकी असून, सध्यातरी त्यात ५२४ बंदी बंदिस्त आहेत. नवीन बॅरेकच्या बांधकामामुळे ६० अतिरिक्त बंदींना सामावून घेता येणार आहे.

जिल्हा नियोजन समितीने या प्रकल्पासाठी एकूण १,१०,८०,२१३ रुपयांचा निधी मंजूर केला, ज्यामध्ये पुरुष बंद्याकरिता दोन बॅरेकसाठी ७३,७७,५१४ रुपये व तृतीयपंथी बंद्याकरिता एक बॅरेकसाठी ३७,०२,६९९ रुपये खर्च केले गेले.

या उद्घाटनादरम्यान, कारागृहातील बंद्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली, ज्यामध्ये टी.बी., एच.आय.व्ही., क्षयरोग, कुष्ठरोग इत्यादींवर उपचार करण्यात आले. सुरक्षा व्यवस्थेसाठी चार वॉचटॉवर आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या रंगरंगोटीच्या कामांची प्रगती पाहून डॉ. जालिंदर सुपेकर यांनी कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.

उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. नखाते, वरिष्ठ तुरुंगाधिकारी  गजानन विठ्ठल पाटील आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment