लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट; आता महिलांच्या खात्यात थेट 3 हजार रुपये जमा होणार ? जाणून घ्या सविस्तर….!

---Advertisement---

 

राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडक्या बहीण योजनेबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात.

मात्र मागील काही महिन्यांपासून अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले नव्हते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे या निधीच्या वितरणात काही प्रमाणात विलंब झाल्याचे सांगितले जात होते.

दरम्यान, आता सरकारकडून या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पैसे एकत्रितपणे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याची तयारी सुरू आहे.

म्हणजेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक महिलांच्या खात्यात थेट 3 हजार रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, या योजनेत काही अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याच्या तक्रारी समोर आल्यामुळे सरकारने KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ज्या महिलांनी KYC पूर्ण केलेली नाही, त्यांना ती पूर्ण करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतरही KYC पूर्ण न केल्यास अशा महिलांचा हप्ता बंद होण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे.

राज्य सरकारने अर्थसंकल्पात या योजनेसाठी मोठी तरतूद केली असून, ही योजना पुढेही सुरूच राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---