---Advertisement---

आषाढीनिमित्त आमदार सुरेश भोळेंच्या हस्ते पांडुरंग साई कॉलनीत महाआरती

---Advertisement---

जळगाव : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त प्रती पंढरपूर असलेल्या पिंप्राळा येथील पांडुरंग साई रेसिडेन्सीमधील विठ्ठल मंदिरात सकाळी कुमुद व यश धन्यकुमार जैन, वर्षा व सचिन अशोक चौधरी या नवदाम्पत्यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक करण्यात आला. तर सायंकाळी आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी चित्रादेवी प्रभाकर लाठी व नेहा जितेंद्र लाठी यांच्या हस्ते प्रसाद व साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. सायंकाळी कॉलनी परिसरातून दिंडी काढण्यात आली.

यावेळी पांडुरंग साई रेसिडेन्सी मधील महिला भगिनी पारंपरिक वेशात सहभागी झाल्या होत्या. रात्री आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, माजी नगरसेवक विजय पाटील उपस्थित होते. यानंतर पांडुरंग साई भजनी मंडळातर्फे भजनसंध्या हा कार्यक्रम घेण्यात आला. पिंप्राळा पंचक्रोशतील भाविकांनी पिंप्राळा रथोत्सवासोबतच येथील पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला.

---Advertisement---

पांडुरंग साई बहुद्देशीय संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कुलकर्णी, संतोष सांगोरकर, प्रदीप धनगर, अशोक पाटील, नवल पांडे, गणेश पाटील, भूषण पाटील, भूपेश बडगुजर, कैलास वाघ, धनराज धनगर, मनोज पाटील, साईनाथ धनगर, नितीन पाटील, अमोल पाटील, भूषण काळे, धनराज तायडे, प्रतीक पाटील, सिद्धार्थ अहिरे, राकेश माहेश्वरी, लक्ष्मीकांत लड्ढा, जिवनदास मेश्राम, दत्ता सोनवणे, मंगेश शिरसाठ, पंकज शिरसाठ, महेश पाटील, बबलु सुरवाडे, निखिल बाविस्कर, हेमंत ठाकुर, राजेंद्र सुतार, धन्यकुमार जैन यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---