---Advertisement---
जळगाव : आषाढी एकादशीनिमित्ताने साई इच्छा फाउंडेशनतर्फे एक सामाजिक आणि भावनिक दृष्टीने महत्वाचा उपक्रम राबविण्यात आला. रुग्णालयात तसेच बेघर आणि गरजू लोकांना मोठ्या श्रद्धा आणि सेवाभावाने फराळ आणि अन्न वाटप करण्यात आले.
या उपक्रमात पारंपरिक एकादशी फराळाचे पदार्थ भगर, खजूर, लाडू, शेव, चिवडा आणि सुकामेव्याची पाकिटं वाटण्यात आली. “जय हरी विठ्ठल” चा घोष करत स्वयंसेवकांनी मोठ्या भक्तिभावाने गरमागरम फराळाचे वाटप केले.
---Advertisement---
फाउंडेशनतर्फे यंदा एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. यात सिविल हॉस्पिटलमध्ये नुकत्याच बाळंत झालेल्या महिलांसाठी व बाळंतीण महिलांसाठी पोषक आहार म्हणून दूध, सुकामेवा, राजगिरा लाडू , ताज्या फळांचे रक्त वाढविणाऱ्या पदार्थांची वाटप करण्यात आली. लहान मुलांनाही फळं आणि दूध देऊन त्यांची काळजी घेण्यात आली. याप्रसंगी अनेक महिलांचे डोळे पाणावले त्यांनी फाउंडेशनचे आभार मानले.
फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपाली शिरापुरे (कासार) म्हणाल्या, “एकादशी उपवासाचा अर्थ केवळ स्वतः उपाशी राहणे नव्हे, तर उपाशी असणाऱ्याला अन्न देणे. नुकत्याच बाळंत झालेल्या महिलांना व बाळंतीण महिलांना आणि लहान मुलांना पौष्टिक आहार मिळणं गरजेचं आहे. हीच खरी विठोबा सेवा. पुढेही असे उपक्रम सातत्याने राबवू.”
फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा उपक्रम यशस्वी केला. मंदिर परिसरात भक्तिभाव, माणुसकीची ऊब आणि मदतीचा हात मिळाल्याने अनेकांचे चेहरे खुलले. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत संस्थेला शुभेच्छा दिल्या.