Pachora Accident News : गॅस सिलिंडरचा स्फोट; मुलासह आई गंभीर जखमी

पाचोरा | येथे एका डोसा सेंटरमध्ये गॅस सुरु करताना गॅसचा अचानक भडका उडाला. यात आई व मुलगा भाजले असून त्यांना पाचोरा येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्याचा सूचित केले. दरम्यान, गॅस सिलेंडरचा स्फोट एवढा भीषण होता की, त्याचा आवाज जवळपास अर्ध्या किलोमीटरपर्यंत गेला. या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण दिसत होते.

महाराणा प्रताप चौका जवळ पेट्रोल पँपासमोर बालाजी डोसा सेंटर आहे. हे सेंटर ईश्वर संतोष पाटील (वय ३२ ) यांच्या मालकीचे आहे. सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास डोसा सेंटरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे दुकानाची पत्रे व संपूर्ण सेट, टेबल खुर्च्या, भांडे साहित्य जाळून खाक झाले. याअपघातात दुकान मालकाचे सूमारे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे. यासोबत या सेंटर शेजारी असलेले तीन ते चार दुकानांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ईश्वर संतोष पाटील हे मुळचे वेरूळी खुर्द तालुका पाचोरा येथील रहिवासी असून गेल्या दिड वर्षांपासून पाचोरा येथील संघवी कॉलनीत राहुन इडली डोसाच्या व्यवसाय करुन उदर निर्वाह करीत आहेत. ईश्वर पाटील व त्यांची आई लताबाई संतोष पाटील (वय – ५२) हे दोघी नेहमीप्रमाणे सकाळी साडे सहा वाजता दूकानात आले. यानंतर त्यांनी दुकानाची साफसफाई केली. साफसफाई झाल्यानंतर सकाळी ७.२० वाजेच्या सुमारास इडली व डोसा बनविण्यासाठी लताबाई पाटील यांनी गॅस सिलिंडर पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. त्यात मुलगा आणि आई हे दोघे मोठ्या प्रमाणात भाजले. सिलेंडर स्फोटाचा आवाज अतिशय मोठा आल्याने परिसरातील नागरीकांनी अपघातस्थळाकडे धावत घेतली. नारिकानी आई व मुलगा या दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल. मात्र दोघांची तब्येत गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले. घटनास्थळी तात्काळ विज वितरण कंपनीचे कर्मचारी दाखल होवुन त्यांनी वीज पुरवठा खंडित केला.