पाचोरा बस स्टँडवरील चोरीचा पर्दाफाश; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

---Advertisement---

 

जळगाव : पाचोरा बस स्टँड परिसरात घडलेल्या चोरीच्या प्रकरणाचा पाचोरा पोलिसांनी छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत ही कारवाई केली.


मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्च 2026 रोजी पाचोरा येथील आठवडी बाजारात आलेल्या 70 वर्षीय व्यक्तीकडून सुमारे 50 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. त्यामध्ये एक आरोपी अल्पवयीन असून दुसरा 19 वर्षीय तरुण असल्याचे समोर आले आहे. दोन्ही आरोपी जळगाव जिल्ह्यातील असून त्यांनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---