Pachora News : लाच घेताना महावितरण अभियंता रंगेहात एसीबीच्या जाळ्यात

---Advertisement---

 

Pachora News : व्यवसायाच्या तीन प्रकरणांना रिलीज ऑर्डर काढुन देण्यासाठी २९ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाचोरा येथील सहायक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे (वय ३८, रा. अभियंतानगर, संभाजी चौकजवळ पाचोरा) याना रंगेहात पकडले. सोमवारी (११ ऑगस्ट) तसेच मंगळवारी (१२ ऑगस्ट) रोजी सापळा पडताळणी दरम्यान लाचखोरी समोर आली.

तक्रारदार यांचा सोलर फिटिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी एकुण तीन प्रकरणे तयार करुन ऑनलाईनव्दारे महावितरण कार्यालयात सादर केले होते. या तिनही प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढुन देण्यासाठी तीन हजार प्रमाणे एकूण नऊ हजार व यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढुन दिली आहे. त्याची लाच सहायक अभियंता मनोज मोरे लाच मागत होते. तक्रारदार यांनी या प्रकरणी ११ ऑगस्ट एसीबीकडे तक्रार दिली होती.

अशी मागीतली लाच

पडताळणी दरम्यान सहायक अभियंता मोरेनी तीन प्रकरणांचे रेग्युलर प्रमाणे नऊ हजारची मागणी केली. तसेच यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढली आहे. त्याचे तुम्ही वन टाइम पेमेंट करत आहात म्हणून अडीच हजार प्रमाणे ७० हजार रुपये होतात. त्यापैकी तुम्ही तीन हजार दिले आहेत. उर्वरित ४० हजार पैकी पहिल्या हप्त्याचे आज २० हजार व चालुच्या तीन प्रकरणांचे नऊ हजार अशी एकुण २९ हजार रुपयांची मागणी करुन ती स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्याचवेळी पथकाने अभियंता मनोज मोरेना रंगेहात त्यांच्या कार्यालयात ताब्यात घेतले.

एसीबीचे उपअधिक्षक तथा पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, सापळा व तपासी अधिकारी स्मिता नवघरे यांच्या पथकातील कॉन्सटेबल राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकूर, चालक सुरेश पाटील यांनी सापळा कारवाई केली. याप्रकरणी अभियंत्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---