पाचोरा महसूल विभागाची मध्यरात्री कारवाई’; ट्रॅक्टरसह डंपर जप्त, वाळूमाफियांचे धाबे दणाणले

---Advertisement---

 

पाचोरा तालुक्यात अवैध वाळू उपसा तसेच अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने आपली धडक मोहीम अधिक तीव्र केली आहे. दि.१० फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्ती पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारे एक डंपर आणि एक ट्रॅक्टर जप्त केले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू चोरट्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पहिली कारवाई पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द ते खडकदेवळा बुद्रुक या रस्त्यावर करण्यात आली, जिथे अवैध वाळू घेऊन जाणारे डंपर पथकाने ताबा मिळवत जप्त केले. तर दुसऱ्या कारवाईत मौजे बांबरुड येथून वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आला. ही दोन्ही वाहने पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. एकाच दिवशी झालेल्या या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
महसूल विभागाने कुरंगी येथून गिरणा नदीपात्रात जाण्यासाठीचा मुख्य रस्ता खोदून ठेवला असला, तरी वाळू माफिया इतर चोरवाटांचा वापर करून वाहतूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, भरारी पथकांच्या सतर्कतेमुळे त्यांचे हे प्रयत्न फसत आहेत.
मंडळ अधिकारी सुनील पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली असून या पथकात ग्राम महसूल अधिकारी सागर बागुल, रितेश गोसावी, रामकृष्ण बळी, अतुल पाटील आणि वाहन चालक विश्वेश सपकाळे यांचा पथकाने  कारवाई केली आहे .

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---