शांतता चर्चेत पाकिस्तान मध्यस्थ म्हणून ‘ना’ लायक, इराणने सुनावले

---Advertisement---

 

तेहरान : पाकिस्तान आमचा मित्र नक्कीच आहे, पण तो या संघर्षात निष्पक्ष मध्यस्थी करण्याच्या लायक नाही. आम्ही विश्वास ठेवून त्यांच्या मध्यस्थीने चर्चा केली, परंतु तो विश्वासार्ह नव्हता. अमेरिकेच्या हितालाच त्यांनी प्राधान्य दिले, त्यामुळे शांतता चर्चा अपयशी ठरली असा आरोप इराणी संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते इब्राहिम रेजई यांनी केला.

सरकारी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रेजई म्हणाले, पाकिस्तान अनेकदा अमेरिकेच्या आणि विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या हितांना प्राधान्यदेतो. त्यांच्या विरोधात काहीही बोलण्याचे धाडस पाकिस्तान करत नाही. एक योग्य मध्यस्थ तोच असतो जो दोन्ही बाजूंकडे निष्पक्षपणे पाहतो, पण पाकिस्तानचा कल नेहमीच एका बाजूला झुकलेला असल्याने इस्लामाबाद येथील शांतता चर्चा निष्फळ ठरली. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सुरक्षा हा केवळ इराणचा नाही, तर जगाचा मुद्दा आहे. आम्हाला यापुढे पाकिस्तानात चर्चा नकोच आहे.

पाकिस्तान उघडपणे अमेरिकेवर टीका करणे टाळतो. लेबनॉनचा प्रश्न असो किंवा इराणची गोठवलेली मालमत्ता, अमेरिकेने आपली आश्वासने पाळली नाहीत यावर पाकिस्तान कधीही भाष्य करत नाही. अशा स्थितीत पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश ठरू शकत नाही.

तीन दिवसांत निर्णय घ्या अन्यथा…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शेवटचा इशारा देत म्हटले की, शांतता करारावर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांच्याकडे केवळ तीन दिवस उरले आहेत. त्यांनी निर्णय न घेतल्यास तेलसाठे, पाईपलाईन आणि ऊर्जा केंद्रे उद्ध्वस्त होईल. होर्मुझमधील नाकाबंदीमुळे तेलाचा उपसा थांबला असून पाइपलाईनमधील वाढत्या दाबाने त्या तांत्रिक कारणांमुळे स्वतःहून फुटू शकतात आणि त्यांची दुरुस्ती अशक्य होईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---