---Advertisement---

अकरावीत प्रवेश मिळत नसल्याने वाघोदा येथे पालकांनी वर्गांना ठोकले कुलूप

---Advertisement---

---Advertisement---

सावदा : राज्य शासनाने चालू शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेच २०२५-२६ पासून ११ वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धत अवलंबली आहे. यामुळे ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. असाच प्रकार रावेर तालुक्यात घडला आहे.

सावदा येथून जवळ असलेल्या मोठे वाघोदे येथील प्रकाश विद्यालयात विज्ञान शाखेचा प्रारंभ करण्यात आला होता. मुलींना पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जात येत नसल्याने त्यांना विज्ञान शाखेचेही शिक्षण घेता यावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून गावातील प्रकाश विद्यालयात विज्ञान शाखा सुरु करण्यात आली. परंतु, ज्या मुलींसाठी हा वर्ग सुरु करण्यात आला त्याच मुली मेरिट लिस्टमुळे प्रवेशापासून वंचित राहावे लागत असल्याने पालकांनी आकवीच्या वर्गाला कुलूप ठोकले आहे.

अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रथम व द्वितीय फेरीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाहीत यात गावांतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर त्यांच्या पुढील शिक्षणाचे काय ? या भीतीपोटी गावातील पालकांनी थेट विद्यालय गाठले. या पालकांनी चक्रधर शिक्षण प्रसार मंडळाचे सचिव किशोर पाटील, संचालक पी. एल. महाजन, कुलदीप पाटील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या आपल्या तक्रारी मांडल्या.

यात मुला-मुलीच्या काळजीपोटी व मोलमजूरी करण्याऱ्या पालकांची पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी पाठविण्याची अर्थिक परिस्थिती नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. हे विद्यार्थी पहिलीच्या वर्गापासून याच विद्यालयात शिक्षण घेत आहेत. यामुळे आकारवीसाठी देखील याच विद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी सर्व पालक आग्रही झाले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विद्यार्थी व पालक यांनी विद्यालयात प्रवेशासाठी ठिय्या आंदोलन केले होते. तरीही आजपावतो प्रवेशासाठी कुठलाही व निर्णय न लागल्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक यांनी शाळेवर मोर्चा काढून अकरावीच्या वर्गाला कुलूप लावले व आपला रोष व्यक्त केला.

अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात असलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर पालकांनी व शिक्षकांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या. संस्थेच्या संचालक मंडळातर्फे कुलदीप पाटील, पी. एल. महाजन यांनी विद्यालयात येऊन पालकांची समजुत काढत सचीव किशोर पाटील यांचे मंत्री गिरीष महाजन व आमदार चंद्रकात पाटील यांच्याशी या संदर्भात बोलणे झाले आहे असे सांगितले. आपल्या विद्यालयातून १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश करुन घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे व करु असे आश्वासन पालकांना दिले. महीला व पालकांनी आम्ही आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे स्वतः जाऊ व तक्रार करु असा ठाण मांडला तर विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकांनीही आम्ही पण सहकार्य करू असे आश्वासन दिले पालकांना शांत राहण्याचे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---