---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : १० वी, १२ वी नंतर करिअर करण्यासाठी विविध क्षेत्र उपलब्ध आहेत. पालकांनी मुलांना त्यांचे करिअर निवडतांना आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादू नये. मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर निवडण्याची संधी देणे हे पालकांचे कर्तव्य असल्याचे मत आ. सुरेश भोळे यांनी व्यक्त केली. ते प्रभाग क्र. १३ मधील १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या सोहळ्याचे आयोजन माजी नगरसेविका सुरेखा तायडे, समाज सेविका दिपाली कुलकर्णी मानसी भूपेश कुलकर्णी यांच्या तर्फे शनिवारी (७ जून) रोजी मायादेवी नगरातील रोटरी हॉल येथे करण्यात आले होते.
आ. भोळे पुढे म्हणाले की, आपल्या आयुष्यात शिक्षण जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे संस्कार असतात. घरातून मुलांना चांगले संस्कार मिळाले तर तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकतात. संस्कारासोबतच विद्यार्थ्यांनी अभ्यासातून वेळात वेळ काढून आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावे. निरोगी आरोग्य असेल तरच आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो. यामुळे प्रत्येकाने दिवसातून एक तास स्वतः च्या फिटनेससाठी द्यावा. जीवनात शिक्षण, आरोग्य आणि संस्कार या तिघांचा यॊग्य समन्वय साधून आपण भारताचा चांगला नागरिक कसे होऊ याकडे लक्ष देणे आपले कर्तव्य आहे. दरम्यान, आ . भोळे यांनी आयोजकांच्या कार्याचे कौतूक केले.
याप्रसंगी भाजप प्रदेश युवा उपाध्यक्ष भैरवी वाघ-पलांडे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी , माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेविका गायत्री राणे, सुरेखा तायडे, माजी नगरसेवक जितेंद्र मराठे, अजित राणे , सावखेडकर सर, शैला चौधरी, भूपेश कुलकर्णी, नितीन तायडे, चंद्रशेखर कापडे, दीपाली कुलकर्णी, मानसी कुलकर्णी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक भूपेश कुलकर्णी यांनी केले तर ऋतुजा संत यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
