जळगाव : दिवसातील काही वेळ भगवंताच्या सानिध्यात व पूजनात घालवला पाहिजे. त्यामुळे मनःशांती लाभते असे प्रतिपादन आ. सुरेश भोळे यांनी केले आहे. ते सिखवाल ब्राह्मण समाज आयोजित अन्नकुट महोत्सवाला उपस्थिती देऊन नागरिकांशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी नागरिकांनी त्यांना पुन्हा निवडून येण्यासाठी शुभाशीर्वाद दिलेत.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांनी सिखवाल ब्राह्मण समाज आयोजित अन्नकुट महोत्सवाला उपस्थिती दिली. याप्रसंगी, आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात मन:शांती लाभते असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे यांनी केले. शहरात सिखवाल ब्राह्मण समाजातर्फे अन्नकुट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेला समाज बांधवांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थिती दिली होती. कार्यक्रमांमध्ये महिला आणि पुरुष भाविकांनी भक्तीभावाने मनोभावे पूजन-अर्चन केले. सिखवाल ब्राह्मण समाजाने भगवान शृंगारऋषी महाराजांना अन्नकुट प्रसादी अर्पण केली. यामध्ये समाज बांधवांनी अन्नकूट प्रसादी घेतली.
दरम्यान, आ. सुरेश भोळे यांनी यावेळी उपासनेचे महत्त्व सांगितले. आध्यात्मिक साधना व मनःशांती यांचा असणार संबंध आ. भोळे यांनी स्पष्ट केला. यावेळी आ. सुरेश भोळे यांनी महर्षी ऋष्य शृंग यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले. जीवनात आध्यात्मिक साधना महत्त्वाची आहे. दिवसातील काही वेळ भगवंताच्या सानिध्यात व पूजनात घालवला पाहिजे. त्यामुळे मनःशांती लाभते असे आ. भोळे यांनी सांगितले. याप्रसंगी नागरिकांनी त्यांना पुन्हा निवडून येण्यासाठी शुभाशीर्वाद दिले व आम्ही तुमच्या पाठीशी राहू अशी ग्वाही दिली.