पहाटे शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, ९६ आरोपींची धरपकड : अन्य ७८ जणांना तंबी

---Advertisement---

 

जळगाव मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस कायदा सुव्यवस्थेसाठी अलर्ट झाले आहेत. शनिवारी (३ जानेवारी) पहाटे चार ते सहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी शहरात कोंबींग ऑपरेशन राबवित ९६ संशयित आरोपींची धरपकड केली. अन्य ७८ जणांना शहरात शांतता राखण्याची समज देऊन पोलीस ठाण्यातून सोडण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडावी, यासाठी ही कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते.

कोंबींग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत ४१ (यात एनबीडब्ल्यू वारंटम धील आठ जण), रामानंदनगर पोलीस ठाणे १६, शनीपेठ पोलीस ठाणे २१ (यात एनबीडब्ल्यू चार जण) तसेच शहर पोलीस ठाणे अंतर्गत १८ (यात एनबीड्ब्ल्यू सहा) असे एकुण ९६ जणांना ताब्यात घेतले.

या ९६ इसमांना ताब्यात घेतले असता त्यापैकी १८ संशयित आरोपींना न्यायालयाने समन्स, बेलेबल वारंट काढुनसुध्दा हजर राहत नव्हते. म्हणुन त्यांच्यावर विविध न्यायालयाकडून नॉन बेलेबल वारंट काढण्यात आले होते. त्याची कोबींग ऑपरेशनदरम्यान बजावणी करुन अटकसत्र पोलिसांनी राबविले.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोनि कावेरी कमलाकर, पोनि. सागर शिंपी, पोनि. राजेंद्र गुंजाळ, पोनि. बबन आव्हाड यांच्या अनिधस्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी संयुक्तीकरित्या शहरात कोबींग ऑपरेशन राबविले.

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

जळगाव जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी तसेच विविध स्वरुपाचे सण, उत्सव, थोर पुरुषांच्या जयंती या साजऱ्या होणार आहेत. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अप्पर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियम अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे प्रतिबंधात्मक आदेश ३१ डिसेंबर २५ रात्री एक वाजेपासून ते १४ जानेवारी २६ रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. आदेशान्वये शस्त्र बाळगणे, स्फोटके, धोकादायक वस्तू वापरणे, प्रतिमा दहन तसेच पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या पूर्व परवानगी शिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. सरकारी कार्यक्रम, अंत्ययात्रा, लग्न समारंभ व धार्मिक मिरवणुका तसेच शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे. त्यांना हा आदेश लागू होणार नाही, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---