Dhule News : साडेसात कोटींचा अंमली पदार्थांचा साठा केला नष्ट

---Advertisement---

 

Dhule News : जिल्हा पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला अमली पदार्थांचा मोठा साठा शिरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या मागील मोकळ्या जागेत नष्ट केला. एकूण ३ हजार ६२४.६०० किलो वजनाचा व सात कोटी ४७ लाख १६ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला.

नाश केलेल्या अमली पदार्थांत सुका गांजा २१०९.७१० किलो (किंमत पाच कोटी २७ लाख ४२ हजार ७५० रुपये), गांजाची झाडे १३४४.९३० किलो (दोन कोटी एक लाख ७३ हजार ९५०) आणि अफ चे बोंड ११९.९६० किलो (१७ लाख ९९ हजार ४०० रुपये) असा एकूण ३६२४.६०० किलो मुद्देमालाचा समावेश होता. एनडीपीएस कायद्यांतर्गत धुळे तालुका, शिरपूर तालुका, सोनगीर, थाळनेर, शिरपूर शहर, नरडाणा व मोहाडी या पोलिस ठाण्यांतील एकूण २५ गुन्ह्यांमधील जप्त अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.

न्यायालयीन आदेश व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई पार पडली. जिल्हास्तरीय प्रादेशिक अमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष तथा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या समिती सदस्य, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक स्वाती काकडे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, प्रभारी उपविभागीय मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी विश्वजित जाधव, तहसीलदार शिरपूरचे महेंद्र माळी, सहाय्यक रासायनिक विश्लेषक एम. ए. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पंचनामा झाला. त्यानंतर खड्डा खोदून त्यात अमली पदार्थ टाकण्यात आले. त्यावर रासायनिक प्रक्रिया करून जाळून नाश करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नियंत्रणाखाली वनरक्षक महारू देसाई, श्री. पावरा यांनी पंच म्हणून काम पाहिले. शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, शिरपूर शहरचे पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, थाळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह मनोज कचवे, किशोर चव्हाण, कैलास जाधव, सलीम पटेल, सतीश जाधव, सुरेश भालेराव, नितीन दिवसे, प्रशांत माळे, मयूर पाटील, नितीन पाटील, दगडू कोळी, बाळू चव्हाण, राहुल पाटील, जाकीर शेख, दिनेश सोनवणे, कृष्णा पावरा, स्वप्नील बांगर आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---