जळगाव : शाहुनगरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून हा रस्ता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सिमेंटकाँक्रीटचा नविन रस्ता बनविण्यात यावा अशी मागणी स्थानिक रहिवाश्यानी आमदार सुरेश भोळे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन शाहुनगरातील सर्व त्रस्त नागरिकांनी दिले आहे.
शाहूनगर भागातील मनोज भोई यांच्या घरापासुन ते शुभम धर्मेंद्र कदम यांच्या घरापर्यंत असलेल्या रस्त्याची अंत्यत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्ता हा खालीवर असमोतोल झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळस रस्त्यावर पायी चालणे ही कठीण होऊन जाते.
---Advertisement---
रस्त्यातील खड्ड्यांमुळे काही महिलांचा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या हात, पाय फ्रॅक्चर होण्याच्या घटना ही घडल्या आहे. तरी हा रस्ता आमदार निधीतून मंजुर करावा. तसेच रस्ता बनविताना काही अतिक्रमणाची समस्या उद्भभवल्यास एक दोन अतिक्रमणधारक वगळता सर्व अतिक्रमणधारक रस्त्यास अडथळा ठरणारे अतिक्रमण स्वतः काढण्यास तयार आहे. तरी आपणा ह्या प्रकरणात लक्ष घालावे अशी शाहुनगर मधील नागरिकांची विनंती केली आहे.
निवेदनांवर वेळी संस्थेचे अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, हितेंद्र टेकावडे, अशोक जाधव, सुनील मराठे, संजीव टाकावडे, यशवंत पिसाळ, संजय साळूंखे, शरद टेकावडे, महेंद्र टेकावडे, संतोष जगताप, हरीश कोयते, योगेश टेकावडे, संदीप टेकावडे, कैलास चौधरी, कल्पेश शेटे , नरेंद्र निंबाळकर, कृष्णा चव्हाण, प्रमोद वाणी, अय्युब भिस्ती, बाळू बांदल, आसिफ अब्दुल भिस्ती, सचिन कदम आदी रहिवाश्यांची स्वाक्षरी आहे.