जामनेरात घरफोडी करत लाखोंचा ऐवज केला लंपास, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

जळगाव : जिह्यातील जामनेर शहरातील बेस्ट बाजार, नवकार प्लाझा येथील शिक्षक दांपत्याच्या घरात १९ डिसेंबर रोजी एक धाडसी चोरी घडली आहे. यात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातून वीस हजार रुपये रोख व ५० ग्रॅम सोने घेऊन पोबारा केला. याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बेस्ट बाजार, नवकार प्लाझा येथील किरण श्रीराम महाजन व त्यांची पत्नी शिक्षक आहेत. ते आपल्या पत्नीसह सकाळी साडे सहा वाजता आपल्या  घराला कुलूप लावून शाळेत गेले होते. हीच संधी हेरत चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडला. चोरट्यांनी घरातून वीस हजार रुपये रोख व ५० ग्रॅम सोने घेऊन पोबारा केला. दरम्यान, चोरट्यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून, घराच्या कडीकोयंडा तोडून चोरी केली.

चोरी झाल्यानंतर, पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली.  यानंतर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, सचिन महाजन, दिपक जाधव, राहुल महाजन हे घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर फिंगरप्रिंट पथक, श्वान पथक दाखल होऊन सदर घटनेची चौकशी करत किरण महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर संशयितांचा त्यांचा शोध सुरू असलेल्याची माहीती पोलीस निरीक्षक मुरलीधर यांनी सांगितली.  तर चोरट्यांनी बिल्डिंग परिसरातील सीसीटीव्ही तोडल्यानंतर ही धाडसी चोरी केल्याचे शिक्षक किरण महाजन यांनी सांगितले.