---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड या चार वर्षीय बाळाचा दि. १जून रोजी मृत्यू झाला होता. या घटनेला मनपा प्रशासन जबाबदार असून त्याच्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच मयताच्या कुटुबियांना शासनाने 25 लाखाची आर्थिक मदत द्यावी, यामागणीसाठी आज सोमवारी (९ जून) जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनआंदोलन करण्यात आले .
जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बॉबीला न्याय मिळालाच पाहिजे, असे म्हणत आरपीआय महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले. या जनआंदोलन प्रसंगी मोकाट कुत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे, मनपा आयुक्तांवर कारवाई झालीच पाहिजे, मनपा प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
---Advertisement---
अनिल अडकमोल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, नागेश्वर कॉलनीतील अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड या बालकाला मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. नागेश्वर कॉलनी व परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. याबाबत येथील रहिवाशांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे मोर्चा, निवेदन देऊन त्यासंदर्भात तक्रार केली होती. परंतु, गेंड्याच्या कातडीच्या महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. याचा एक लहान मुलगा बळी ठरला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व एकत्र येऊन याचा आम्ही निषेध व्यक्त करुन आम्ही जनआक्रोश करत आहोत. या घंटनेनंतर शासनाचा कोणताही अधिकाऱ्याने गायकवाड कुटुंबाची भेट घेतली नाही किंवा त्यांचे सांत्वन केले नाही. तसेच त्यांना अद्यापही कोणतीही शासनाकडून मिळालेली नाही.
रामानंद नगर पोलिसांनी या बाबत सखोल चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करु असे सांगितले होते. परंतु, या घटनेला ९ दिवस उलटून गेले तरी कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली दिसून येत नाही. मनपाने देखील कारवाई केलेली नाही. मोकाट कुत्र्यांनी शहरात विविध उपनगरातील जवळपास २५० नागरिकांना चावा घेतलेला आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा. त्यांना शासनाने आपत्कालीन परिस्थिती म्हणून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी. उपनगरातील पिसाळलेले कुत्रे, मोकाट कुत्रे यांच्यावर मनपाने तातडीने कारवाई करावी. यासोबतच मनपाने कुत्रे निर्बिजीकरण करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी. यासोबतच मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व मनपा आरोग्य अधिकारी उदय वाघ यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहोत. तसेच जिल्हाधिकारी यांनी विशेष बाब म्हणून पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत करावी अशी मागणी करणार असल्याचे
