---Advertisement---

जळगाव विमानतळाजवळ मराठी भाषेत फलक लावा, अन्यथा… मनसेचा इशारा !

---Advertisement---

जळगाव : महाराष्ट्रात मराठी भाषा व परप्रांतीय भाषा यामुळे वाद निर्माण होत आहे. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात मराठी भाषेसाठी नेहमीच आग्रही आहे. परप्रांतीय व्यावसायिकांनी देखील मराठीतून व्यवहार करावे, अशी अपेक्षा मनसेतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

यातच जळगाव विमानतळाच्या परिसरात काही ट्रान्सपोर्ट कंपन्या त्यांचे साईनबोर्ड मराठी भाषेऐवजी त्यांच्या प्रादेशिक भाषेत लिहीत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत महाराष्ट्र निवनिर्माण सेनेतर्फे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

अन्यथा मनसे स्वतः साईनबोर्ड हटविणार

संबंधित कंपन्यांनी दोन दिवसांच्या आत त्यांच्या साइनबोर्डवरून मराठी भाषेचा अपमान दूर करून मराठी भाषेत बोर्ड लावावेत, अन्यथा तिसऱ्या दिवशी मनसे स्वतः त्या बोर्ड्स हटवण्याची कारवाई सुरू करेल असा इशारा दिला आहे.

मनसेचे जळगाव उपमहानगरअध्यक्ष राजेंद्र निकम यांनी अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महाराष्ट्रात मराठी भाषेला प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे. इतर भाषांचा वापर केला जाऊ शकतो, पण त्यासोबत आणि त्याआधी मराठी हवीच.”

हा इशारा दिल्यानंतर स्थानिक व्यावसायिकांमध्ये हालचाली सुरू झाल्या असून, काही कंपन्यांनी बोर्ड बदलण्याचे काम सुरू केल्याची माहिती मिळते.

मनसेचा हा इशारा केवळ भाषेचा अभिमान जपण्यासाठी नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठी असल्याचे पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते सांगत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---