---Advertisement---

Crime News : उपनिरीक्षकाच्या घरावर छापेमारी, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

by team
---Advertisement---

भुसावळ :  जळगाव, भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे याच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापेमारी करत झडती घेतली. या छापेमारीत तब्बल ४० लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल आढळून आला आहे. संशयित सोनवणे हा अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे व खासगी व्यक्ती किरण माधव सूर्यवंशी (३७, रा. नवीन हुडको, भुसावळ) यांच्यावर फैजपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील राजकिरण सोनवणे हा फरार आहे. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुसावळ येथील विशेष न्यायालयाची परवानगी घेत शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता दोन पंच आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्या समक्ष छापेमारी करत व्हिडिओ शूटिंगसह त्याच्या राहत्या घराची झडती घेतली

या छापेमारीत ४० लाख ९८ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घरातून १ लाख ४९ हजार २९० रुपयांच्या दारूच्या बाटल्या, २५ लिटर गावठी हातभट्टी दारू, बुलेट मोटरसायकल, कारचे कागदपत्र, सोनं-चांदीचे दागिने, पिस्तूलाच्या रिकाम्या पुंगळ्या, तसेच १ लाख ९१ हजार रुपयांची रोकड आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.

या कारवाईमध्ये नाशिक लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिला घागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भाग घेतला. जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. याप्रकरणामुळे भुसावळ विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment