जळगाव जिल्ह्यात रामनवमी उत्साहात; मंदिरांत भाविकांची प्रचंड गर्दी

---Advertisement---

 

श्री राम नवमी निमित्त जळगाव जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी मंदिरांचे दरवाजे सकाळी लवकर खुले करण्यात आले होते.


रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली असून फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर उजळून निघाला होता. पहाटे काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर प्रभू रामरायांचा दुग्ध महाअभिषेक करण्यात आला.


दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कथा वाचन करत दादा महाराज जोशी यांनी प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे तसेच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रभू रामरायांची आरती करण्यात आली.


यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. “जय श्रीराम” च्या जयघोषाने संपूर्ण जळगाव शहर दुमदुमून गेले असून, रामभक्तांच्या उत्साहाला विशेष उधाण आलेले पाहायला मिळाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---