रावेरमध्ये गौणखनिज अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनांचा होणार लिलाव

रावेर:  रावेर तालुक्यातील  गौणखनिज अवैध उत्खनन आणि वाहतुक करणाऱ्या वाहनांना तहसिल कार्यालयातील बैठे पथक व भरारी पथकांनी जप्त केले होते. याप्रकरणी संबंधित वाहन मालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले होते.  परंतु, आदेशानुसार दंडात्मक रक्कम शासनाला जमा न झाल्याने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

रावेर तालुक्यातील वाहनांचा लिलाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांच्या कडून मूल्यांकन केल्यानंतर दि. 16 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय रावेर येथे होणार आहे.

या लिलावात योगेश चांभार, संतोष सुरा पवार, केशरलाल पाटील, निलेश नवसिंग जाधव, विलास शतराज तायडे, ललित महाजन, सुभाष चव्हाण, मनोज तुकाराम कोळी, अरुण सुभाष वानखेडे, राज निरबा भिल, विनोद धुमसिंग चव्हाण, तुकाराम सिताराम कोळी यांच्या ट्रॅक्टरचा लिलाव होणार असल्याची माहिती रावेरचे तहसिलदार बी.ए. कापसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.