---Advertisement---

जळगावात रिक्षाचालक मालक बांधवांचा मनसेत जाहीर पक्षप्रवेश

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षाचालक-मालक बांधवांनी आज शुक्रवारी (२५ जुलै) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्षप्रवेश करून राजकीय व सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय सुरू केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवून व पक्षाचे राज्यस्तरीय नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या मार्गदर्शनानुसार हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या प्रसंगी मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांच्या उपस्थितीत २५ रिक्षाचालक-मालक बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत सदस्यता घेतली. रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, प्रशासनातील दिरंगाई आणि शहरातील वाहतूक समस्यांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या माध्यमातून लढा देण्याची बांधिलकी यावेळी स्पष्ट करण्यात आली.

पक्षप्रवेश सोहळ्यावेळी ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले की, “रिक्षाचालक-मालकांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. रेल्वे स्टेशन परिसरात स्वतंत्र थांब्यासाठी वाहतूक सेनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू करण्यात येतील.”

---Advertisement---

या उपक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेंद्र सपकाळे यांच्या विशेष प्रयत्नातून विनोद रामा रायपुरे, कुणाल श्रीराम महाजन, देवचंद शेशमल जाधव, सतीश किसन गवळी, राजू सुरेश कोळी, शांताराम शालीग्राम वाघ, रामचंद्र बाजीराव चव्हाण, किरण बारकु पाटील, नीलेश चंद्रकांत चौधरी, राजेश उल्हास शेळके, जीवन प्रभाकर बारी, राहुल आनंदा पाटील यांच्यासह अनेकांनी पक्षप्रवेश केला.

यावेळी जळगाव शहराचे मनसे उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, ललित शर्मा, चेतन पवार, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, महिला शाखा अध्यक्षा अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, दीपक राठोड, ॲड. सागर शिंपी, खुशाल ठाकूर, संजय मोती, ऐश्वर्य श्रीरामे यांची उपस्थिती लाभली.

हा पक्षप्रवेश म्हणजे रिक्षा व्यावसायिकांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या मनसेच्या भुमिकेवरील विश्वासाचे प्रतिक ठरला असून, आगामी काळात वाहतूक सेनेच्या माध्यमातून रिक्षा चालक-मालकांसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment