रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; मोठा स्फोट व्हावा म्हणून फ्युएल कॅन सीट जवळ ? पायलटने मुद्दाम विमान आपटलं ?

---Advertisement---

 

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे वक्तव्य करत आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला.

आमदार रोहित पवार यांच्या प्रतिक्रियेनुसार, अपघाताच्या दिवशी बारामती परिसरात दृश्यमानता कमी होती. विमान लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या सुमारे ५००० मीटर दृश्यमानतेऐवजी तेव्हा अंदाजे ३५०० मीटर इतकीच व्हिजिबिलिटी होती. अशा परिस्थितीतही पायलट कॅप्टन सुमित कपूर यांनी विमान माघारी न फिरवता खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुद्दाम विमान खाली आदळून स्फोट घडवून आणला असावा, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.

तसेच, मुंबई-बारामती प्रवासासाठी मर्यादित इंधनाची आवश्यकता असताना विमानात ३००० ते ३५०० लिटर इंधन भरले गेले होते, असा दावा त्यांनी केला. एवढेच नव्हे तर विमानाच्या टॉयलेटजवळ अतिरिक्त इंधनाचे कॅन ठेवण्यात आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. अधिक इंधनामुळे मोठा स्फोट घडवण्याचा कट असू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, विमानसेवा देणाऱ्या VSR Aviation कंपनीवरही त्यांनी गंभीर आरोप केले. फ्लाईट प्लॅनमध्ये फेरफार झाल्याचा संशय व्यक्त करत संबंधित ई-मेल आणि कागदपत्रांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. कंपनीकडून तपास यंत्रणेला कागदपत्रे देण्यात विलंब होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या सर्व आरोपांमुळे विमान अपघात प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, अधिकृत तपास अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---