धक्कादायक ! अनैतिक संबंधांचा संशय, निर्दयी पतीने पत्नीसह ४ वर्षाच्या मुलाला संपवलं

मुंबई : कांदिवली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरुन  पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर आपल्या पोटच्या मुलाचीही हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

सुरुवातीला पत्नीच्या आत्महत्येचा बनाव पतीने केला होता. बनावानुसार ही आत्महत्या असल्याचे म्हटले जात होते. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या नवऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा : मित्रासोबत बेडरूममधे होती अन् वडील आले… जानव्ही कपूरने सांगितला ‘तो’ किस्सा

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अटक कऱण्यात आलेल्या आरोपी पतीचं नाव शिवशंकर दत्ता असं आहे. त्यानेच पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर ४ वर्षांच्या चिमुकल्या मुलाला संपवलं. अनैतिक संबंधांच्या संशयावरुन आरोपीने आधी त्याच्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. पुढे त्याने ही आत्महत्याच आहे असे चित्र निर्माण केले. हत्या करताना त्याच्या चार वर्षीय मुलाने पाहिले. तेव्हा आरोपीने पोटच्या पोराचाही जीव घेतला. पत्नी आणि मुलाची हत्या करुन आरोपीने पळ काढला.

हेही वाचा : मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; आता पुढची सुनावणी ‘या’ तारखेला

पोलीस तपासात  प्रकरण आत्महत्येचे नसून हत्येचे असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी आरोपी शिवशंकर दत्ता याचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले आणि बोरीवली लोकल कोर्टात सादर केले. बोरीवली लोकल कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.