---Advertisement---

मशीनच्या सहाय्याने ‘गिरणा’तून वाळू ओरबाडणे सुरूच, पथक दिसताच संशयितांनी काढला पळ

---Advertisement---

---Advertisement---

कढोली, दापोरासहे गिरणा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करुन चोरटी वाहतूक सुरू आहे. दापोरा येथे गिरणा पात्रातून ट्रॅक्टरच्या धुडला लोखंडी वायरसह रोपफावडा मशीन लावीत वाळुचा उपसा केला जात होता. पोलिसांचे पथक दिसताच संशयित पळून गेले. गुरुवारी (३१ जुलै) पहाटे दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

तालुका पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथक दापोरा गावाकडे खाना झाले. स्मशानभूमीजवळ गिरणा नदीकाठावर ट्रॅक्टरचे धूड उभे होते. त्याला लोखंडी वायर रोप फावडा मशीन जोडलेले होते. हे मशीन नदीच्या पात्रातील पाण्यात सोडण्यात येत होते. यंत्राने वाळू भरताच ट्रॅक्टरव्दारे काठावर वाळुचा ढिग लावला जात होता.

हे चित्र पाहिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ नदीकाठावर धाव घेतली. मात्र पोलीस दिसताच संशयितांनी मुद्देमाल जागेवर सोडून पलायन केले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार गुलाब माळी हे तपास करीत आहेत.

धरणातूनही उपसा सुरू

गिरणानदीपात्रात कांताई बंधारा आहे. याठिकाणी जलसाठा असून त्यामधून यंत्राव्दारे वाळुचा उपसा केला जात आहे. कढोली शिवारात मंदिराजवळ वाळुचा ढिग लावला जातो. त्यानंतर डंपरमध्ये वाळू भरुन तिची चोरटी वाहतूक केली जाते. बांभोरी, सावखेडा, वैजनाथ, कढोली, दापोरा, नागाईजोगाई मंदिर परिसर इत्यादी ठिकाणी गिरणा नदीला वाळू उत्खनातून विद्रुप स्वरुप प्राप्त झालेले आहे. शिवारात पाण्याची पातळीही दिवसेंदिवस खोल जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---