जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

---Advertisement---

 

जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी केले.
सद्यस्थितीत कार्यरत असलेले अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी गावीत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नखाते यांच्या पुढील नियुक्तीबाबतचे आदेश मात्र अद्याप जाहीर झालेले नाहीत.


जिल्ह्याचा दांडगा अनुभव ठरणार फायदेशीर

नवनियुक्त अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांना जळगाव जिल्ह्याचा चांगला अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी जळगाव विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून काम करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. तसेच भुसावळ विभागाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या कार्यपद्धतीची जिल्हावासीयांना चांगली ओळख असून, गुन्हेगारी नियंत्रणासाठी त्यांच्या अनुभवाचा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

दरम्यान, गृह विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी राज्य पोलीस सेवेतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
यामध्ये दीपाली मोहन खन्ना यांची कोकण-२ विभागातून मुंबई येथील राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
तर प्रांजली नवनाथ सोनवणे यांची अमरावती विभागातून अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या बदल्यांमुळे राज्य पोलीस यंत्रणेत नवीन जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धतीला गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---