Sangli Crime : शहरालगत असणाऱ्या कदमवाडी रस्त्यावर भर दुपारी बाराच्या सुमारास सेंट्रींग कामगारावर कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. भर रस्त्यात झालेल्या घटनेने खळबळ उडाली. गुरुवारी दि. २० रोजी दुपारी एका कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आईबरोबर कामगाराचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रांच्या मदतीने ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीवाडीहून नदीकाठाने कदमवाडीकडे जाणार्या रस्त्यावर दत्ता सुतार (३५ रा. इंदिरानगर, सांगली) या कामगार खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. मृतदेहाजवळच मृताची दुचाकी आढळून आली होती. हल्लेखोरांनी दगडाने कामगाराला ठेचले. यामुळे अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होती.
हेही वाचा : रात्री अचानक आला आवाज अन् पत्नीचं फुटलं बिंग, पुढे काय झालं?

तीन जणांना अटक
याबाबत शहर पोलीस ठाण्यास माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. घटनास्थळी हल्लेखोरांनी चाकू व कोयता टाकला असला तरी त्यावर रक्ताचे डाग दिसत नव्हते. यामुळे या हत्याराचा वापर केला गेला की नाही? याचा उलगडा होत नव्हता. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासातच तीन संशयितांना ताब्यात घेतले. या तिघांची चौकशी केली असता एकाने त्याच्या आईबरोबर दत्ताचे अनैतिक संबंध होते. या रागातून दोघा साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे. पोलीस तपासात तिघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दि.२१ या तिघांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
सांगलीत पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यास बेड्या
दरम्यान, सांगलीतील वॉन्लेसवाडी परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केले आहे. अरबाज उर्फ इब्राहिम अल्लाउद्दीन रेठरेकर असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अरबाज रेठरेकर हा वॉन्लेसवाडी येथील एका बंद पडलेल्या कंपनीच्या इमारतीत पिस्तूल घेऊन बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली.