मुस्लिम महापौरावरून संजय राऊत-एकनाथ शिंदे भिडले; गद्दारांपेक्षा मुसलमान परवडले- संजय राऊतांची टीका..

---Advertisement---

 

नुकतीच महापौर पदाची निवड प्रक्रिया ही राज्यभरात पूर्ण झाली, यात परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी सय्यद इकबाल यांची निवड झाली. याच निवडीवरून सध्या मुंबईत राजकीय वातावरण चांगलंच आपल्याच पाहायला मिळतं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीच्या मुस्लिम महापौर पदावरून ठाकरे गटावर टीका केली होती आणि या टिकेला प्रत्युत्तर देत, संजय राऊत म्हणाले, “सर्व गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला.” भाजपमध्येही अनेक नगरसेवक हे मुस्लिम आहेत मात्र एकनाथ शिंदे केवळ हिंदू मुस्लिम यांचा भेद करत आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

परभणी महानगरपालिकेचे महापौर हे शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इकबाल झाले आहेत सह्याद्री बाल यांना एकूण 39 मत मिळाली तर भाजपच्या तिरूमला खिल्लारे यांना 39 मत मिळाली. मात्र सय्यद इकबाल हे परभणी महानगरपालिकेचे महापौर झाले असून काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौर झाले आहे याच मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटावर टीका केली होती आणि याच टीकेला ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिला आहे. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या त्या विधानाचा समाचार घेत त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काय म्हणाले ?

एकनाथ शिंदेंना सांगा जरा अभ्यास करा. डोक्याला तेल वगैरे लावा , थंड डोकं होण्यासाठी आण मग अभ्यास करा. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक हे मुसलमान आहेत, हे त्यांना ( शिंदे) माहीत आहे का ? की उचलली जीभ लावली दाढीला ? टाळ्याला पण नाही, दाढीला… असा टोला राऊत यांनी हाणला. परभणीमध्ये भाजपचे 12 नगरसेवक मुस्लिम आहेत. इतर ठिकाणी देखील असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत. या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत. ते काय घुसखोर नाहीत ना ? आमचे तालुकाप्रमुख आहेत ते. आमचे पदाधिकारी आहेत वर्षानुवर्ष काम करणारे ते. मग मुसलमान म्हणून कायकर्त्यांना काय दूर ठेवणार का ? तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला असा घणाघात राऊत यांनी केला.

निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान, गद्दारांना पोटदुखी-राऊतांचा घणाघात:

परभणीतील महापौर निवडीवरून राजकीय वातावरण तापले असून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी थेट विरोधकांवर जोरदार शब्दांत टीका केली आहे. निष्ठावान शिवसैनिकाला महापौरपद मिळाल्याने गद्दारांच्या पोटात दुखणं स्वाभाविकच आहे, असे ते म्हणाले.

परभणीचे नवे महापौर हे पक्षाचे जुने, मेहनती आणि निष्ठावान कार्यकर्ते असून अनेक वर्षांपासून त्यांनी संघटनेसाठी झटले आहे. अशा कार्यकर्त्याला संधी दिली, तर जे लोक पक्षाशी गद्दारी करून बाहेर पडले, त्यांना ते सहन होणार नाही, असा टोला राऊतांनी लगावला.

धर्माच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनाही राऊतांनी थेट सवाल केला. “भाजपने आणि इतर पक्षांनी मुस्लिम उमेदवारांना तिकिटे दिलीच आहेत. देशाचे राष्ट्रपती, सरन्यायाधीश, राज्यपाल हे मुस्लिम झाले आहेत. डॉ. अब्दुल कलाम यांचे योगदान देश विसरू शकतो का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राऊतांचा शिंदेंवर थेट हल्लाबोल:

यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावरही राऊतांनी जोरदार टीका केली. “अक्षरशत्रू म्हणजे काय, याचा अर्थ आधी समजून घ्या. भाजपला संधी मिळाली असती, तर परभणीत १२ पैकी एखादा मुस्लिम नगरसेवक महापौर झाला असता,” असे म्हणत त्यांनी हिंदू-मुस्लिम राजकारणावर घणाघात केला. देशात सतत धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याशिवाय विरोधकांकडे दुसरा कोणताही विकासाचा कार्यक्रम नाही, असा आरोप करत राऊतांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---