---Advertisement---

जळगावात सॉ मिल ला आग, लाखोंचे नुकसान

---Advertisement---

जळगाव : शहरातील बेंडाळे चौक ते नेरी नाका दरम्यान असलेल्या चंद्रिका सॉ मिल (वखार व दुकान) येथे गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच जळगाव महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.


शहरातील गजबजलेला परिसर म्हणून बेंडाळे चौक ते नेरी नाका दरम्यान आगीचे लोळ दिसत होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास चंद्रिका सॉ मिल ला आग भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की ती काही वेळातच ती प्रचंड प्रमाणांत वाढली. यामुळे वखारीतील लाखो रुपये किमतीचे लाकूड, दुकानातील साहित्य, फर्निचर आणि इतर वस्तू जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीच्या धुराचे लोळ एक किलोमीटरपासून दिसत होते. आगीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

---Advertisement---


जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती मिळताच, अग्निशमन अधीक्षक शशिकांत बारी यांनीआगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रथम दोन अग्निशमन बंब पाठविले. अग्निशमन दलाच्या जवान अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. यानंतर या परिसरांत कुलिंगचे काम हाती घेण्यात आले. हे काम दुपारी चार वाजेपर्यंत सुरु होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---