---Advertisement---

मित्रांपेक्षा मिळाले कमी गुण, दहावीच्या विद्यार्थ्यांने उचललं टोकाचं पाऊल

---Advertisement---

पुणे : राज्यात स्टेट बोर्डचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हि परीक्षा लाखो विद्यार्थ्यांनी दिली होती . दहावीचा निकालात सर्व विभाग मिळून जवळपास ९४ टक्के लागला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवत यश संपादित केले आहे.

दहावीचा निकाल लागल्यावर काहींना अपेक्षा पेक्षा कमी गुण मिळाले. अशाच प्रकारे आपल्या मित्रांना अधिक व आपल्याला कमी गुण मिळाल्याने नैराश्यात पिपरी – चिंचवड येथे एका मुलाने गळफास लावून घेत आपली जीवन यात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उमंग रमेश लोंढे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या या कृतीमुळे आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आई-वडील बाहेर जाताच उचललं टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, उमंग हा माटे शाळेचा विद्यार्थी होता. मंगळवारी (१३ मे ) दहावीचा निकाल जाहीर झाला. उमंगला ७५ टक्के मिळाले. परंतु , त्याच्या मित्रांना त्याच्यापेक्षा अधिक गुण मिळाले होते. त्याच्या मित्रांना ८० ते ९० टक्के गुण मिळाले मात्र त्यास ७५ टक्के गुण मिळाल्याने त्याला खूप नैराश्य आले.

उमंगची आई ऑफीससाठी गुरूवारी (१५ मे ) निघाली असता तिला सोडण्यासाठी त्याचे बाबाही गेले होते. त्याने घरात कोणी नसल्याची संधी साधून ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. त्याचे वडिल त्याच्या आईला ऑफीसला सोडून घरी आल्यावर हा प्रकार उघड झाला. आपल्या मुलाने गळफास घेतल्याते पाहून त्याच्या वडीलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी उमंगला घेऊन त्वरीत वायसीएम रुग्‍णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment