विवाहबाह्य संबंधांमुळे पतीला सोडलं, त्यात प्रियकराचा नकार; वैतागलेल्या अवस्थेत पेट्रोलची कॅन घेऊन महिलेने…

---Advertisement---

 

प्रियकरासाठी तिने पतीला सोडलं आणि प्रियकरासोबत काही दिवस राहिल्यानंतर प्रियकराने लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे महिलेला मोठा झटका बसला. हा धक्का दिला सहन न झाल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचललं. कोणीतरी न्याय मिळवून देईल अशी त्या महिलेची ओरड होती. सदर वैतागलेली महिला ही पोलीस स्टेशन समोर पेट्रोलचे कॅन घेऊन पोहोचली. एक तर माझ्या पतीला घरी पाठवा नाहीतर माझ्यासोबत प्रियकराला लग्न करण्यास भाग पाडा अशी अट तिने पोलिसांसमोर ठेवली. सदर वैतागलेल्या महिलेचा पवित्रा पाहूनव पोलीसही चक्रावले. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत महिलेच्या हातातून पेट्रोलची कॅन हिसकावली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

उत्तराखंड मधील उदमसिंहनगर जिल्ह्यातल्या बाजपुर येथील ही घटना आहे. सदर महिलेचे लग्न हे 2008 मध्ये झालेलं होतं आणि ती तिच्या सासरच्या परिवारासह राहत होती. गेल्या दोन वर्षांपूर्वी तिच्या सासरच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत तिचे प्रेम संबंध जुळले. त्यांच्यातच शारीरिक संबंध प्रस्थापित झाले दरम्यान या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ सुद्धा तयार झाले. मात्र या संपूर्ण प्रकरणाची कुटुंबाला कुठेही कुणकुण लागली नाही. मात्र मला त्या तरुणाने गुंगीचा औषध दिलं आणि शारीरिक संबंध ठेवून व्हिडिओ काढण्याचा आरोप त्या महिलेने केला. पण या घटनेमुळे पतीने घटस्फोट दिला. त्यामुळे सदर महिलाही तरुणासोबत दुसरीकडे राहू लागली. ती प्रियकरांसोबत लग्नाचा जगाचा लावत होती मात्र त्याच्या कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्यामुळे तिच्याशी त्याने लग्न करण्यास नकार दिला व तिला सोडून तो गावात परतला.

हेही वाचा, आठ मुलांच्या आई असलेल्या सासूचं जावयावर जडलं प्रेम, मेहंदीची पानं तोडण्याच्या बहाण्याने शेतात भेटले अन् झाले फरार….

दोन वर्षांपूर्वी या महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेम संबंध निर्माण झाले. त्यानंतर पुढे हे प्रकरण वाढत गेलं आणि त्यांच्या शारीरिक संबंध देखील प्रस्थापित झाले. त्यानंतर सदर महिला ही त्या तरुणावर लग्न करण्यास दबाव टाकत होती. त्याने लग्न करण्यास होकार दिला, आणि दोघेही घरातून पळून गेले. सदर महिलेचा लग्न झालेलं होतं म्हणून तिने पतीशी घटस्फोट घेतला. मात्र प्रियकर आणि ती बरेच दिवस एकत्र राहिले त्यानंतर प्रियकाराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे सदर महिलेला मोठा धक्का बसला. आणि तिने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाकडे पोलिसांनी सुरुवातीला लक्ष दिलं नाही. त्यानंतर सदर प्रकरणात पंच जमले आणि त्या तरुणाला त्या महिलेची लग्न करण्याचं सांगण्यात आलं. मात्र तो तरुण काही तयार होत नव्हता. पंचांनी सांगितल्यानंतरही त्याने लग्नास नकार दिला व त्याच्या घरच्यांनी सुद्धा लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.

दरम्यान या प्रकरणाला कंटाळून महिलेने पोलीस ठाणे गाठलं. त्यावेळी महिलेने प्रियकराशी लग्नाचा तगादा लावला नाही मात्र तिच्या पतीकडे पाठवण्याची मागणी पोलिसांकडे केली आणि पोलीस ठाण्यात ती महिला पेट्रोलची कॅन देखील सोबत घेऊन गेली होती. पोलिसांनी तिची समजूत काढली संपूर्ण प्रकरणाबाबत तक्रार नोंदवून घेतली आणि महिलेला आश्वासन दिल की आरोपी विरोधात कडक कारवाई केली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---