---Advertisement---
जळगाव : काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत केलेल्या विधानावरून त्यांच्याविरोधात शहरातील पांडे डेअरी चौकात शिवसेना (शिंदे गट) युवासेनेतर्फे मंगळवारी (५ ऑगस्ट) रोजी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन उत्तर महाराष्ट्र निरीक्षक किशोर भोसले, आणि युवासेनेचे जिल्हा प्रमुख रोहित कोगटा यांनी यांच्या नेतृत्व करण्यात आले.
‘भगवा आतंकवाद’ असा उल्लेख करून पृथ्वीराज चव्हाण यांनी भगव्या विचारसरणीचा अपमान केल्याचा आरोप करत आंदोलन कर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनकर्त्यांनी चव्हाणांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी धिक्कार असो धिक्कार असो पृथ्वीराज चव्हाणांचा धिक्कार असो यासह इतर घोषणा देण्यात आल्या.
पदाधिकरी व कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेत, ‘हिंदुत्व आमचा अभिमान आहे’, ‘हिंदू धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही’, अशा घोषणांनी अवघा पांडे डेअरी चौकात परिसर दणाणून सोडला होता.
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यात अशा प्रकारचे विधान केल्यास त्यांच्या सभास्थळी चहुबाजूंनी भगवे झेंडे लावले जातील. हिंदू धर्म जगाला दिशा देणारा असून तो कधीच आतंकवादी कारवाया करण्यात नाही. हिंदू धर्मात आक्रमकपणा नाही. एकीकडे आतंकवादाला कोणताही धर्म नसतो दुसरीकडे सनातन धर्म हा आतकंवादाचा धर्म आहे असे दुट्टपी धोरण काँग्रेस राबवित आहे, याचा युवासेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.
आम्ही शांततेत आंदोलन केले असले, तरी युवासेना अशा विधानांचा तीव्र विरोध करत राहील, असाही इशारा आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिला. या आंदोलनात उत्तर महाराष्ट्र प्रमुख वैद्यकीय कक्ष जितेंद्र गवळी, जळगाव तालुका प्रमुख अजय महाजन , धरणगाव तालुका प्रमुख दीपक भदाणे, जिल्हा सरचटिणीस नीरज वाणी, तालुका संघटक अविनाश पाटील, वैद्यकीय मदत कक्ष दीपक पाटील, उपतालुका प्रमुख भूषण पाटील, तालूका समन्वयक आकाश पाटील, प्रशांत पाटील, सोनू तायडे, विक्रम परदेशी, विनोद पवार, संतोष ताडे, भरत कुऱ्हाडे, शेषराव लष्करे, भरत कुऱ्हाडे, किरण काटोले, ज्ञानेश्वर बारी, आदी पदाधिकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.