---Advertisement---
जळगाव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने आज सोमवारी (२१ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुती सरकारतील मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचं नेतृत्व जळगाव ग्रामीणचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी केले.
या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (अजित पवार गट), गृहराज्यमंत्री योगेश कदम (शिंदे गट) यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तिन्ही मंत्र्यांच्या प्रतिमांना चुना लावून निषेध नोंदवला.
---Advertisement---
यावेळी प्रा. भाऊसाहेब सोनवणे म्हणाले, “महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि याच दरम्यान कृषी मंत्री विधानभवनात ऑनलाइन जंगली रमी खेळत आहेत. सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असून कर्जमाफी, हमीभाव, भावफरक यांसारख्या मुद्द्यांकडे सरकारचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.” याशिवाय, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर त्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालवण्याचा आरोप करण्यात आला असून, भाजपा नेते प्रफुल्ल लोढा हनी ट्रॅप प्रकरणात पॉक्सो अंतर्गत अटकेत असल्याची माहितीही आंदोलनकर्त्यांनी दिली. त्यामुळे या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह तालुका कार्याध्यक्ष प्रमोद घुगे, अशोक आप्पा सोनवणे, किरण ठाकूर, लोटन सोनवणे, प्रभाकर कोळी, धनराज वारडे, रघुनाथ सोनवणे, स्वप्नील पाटील, खुशाल पाटील, राजू पाटील, अनिल बोरसे, नितीन चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.