जळगाव : येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे राज्य सरकारमधील मंत्र्यांविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले. हा मोर्चा शिवतीर्थ मैदान ते जिल्हाअधिकारी कार्यलयापर्यंत निघाला. मोर्चांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
मोर्चेच्या अग्रभागी सजविलेल्या तीन वेगवेगळ्या ट्रॅक्टरमध्ये संजय गायकवाड, संजय शिरसाट व माणिकराव कोकाटे यांचा मुखवटा परिधान केलेले कार्यकर्ते होते. त्यांच्या नंतर सरकारची प्रतीकात्मक तिरडी घेऊन कार्यकर्ते राजीनामा द्या राजीनामा द्या अशा घोषणा देत सहभागी झाले होते.
---Advertisement---
यावेळी सरकारविरोधात विविध घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी खासदार उन्मेष पाटील, लोकसभाक्षेत्र प्रमुख करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महिला आघाडीच्या महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे ,प्रशांत सुरळकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यलयासमोर करण्यात आली. याप्रसंगी भाषणे झालीत हे शेतकरी व सर्वसामान्यांच्या विरोधातील सरकार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी प्रसमाध्यमांशी बोलताना संजय सावंत संपूर्ण महाराष्ट्रात आज महामोर्चा काढण्यात येत आहे. याच अनुषंगानने जळगावात देखील जिल्हाकधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात जनमाणसांचा आवाज ज्यात शेतकरी, महिला भगिनीअसतील या सर्वांची फसवणूक होत आहे. याच्या विरोधात व हे सर्व चालू असतांना हे सरकार अशा भ्रष्ट मंत्र्यांना घेऊन गेंड्याचे कातडीचे झाले आहे. ते जागेवर यायला हवे शिवसेनेतर्फे राज्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सरकारमधील मोठा वाटा हा भाजपचा आहे, भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे, आरोप केलेल्या मंत्र्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकतात. यापूर्वी मंत्र्यांना आधी जेल मध्ये जाण्याची भीती असायची पण ती आता राहिलेली नाही. भ्रष्ट्राचारचे आरोप केलेले मंत्री भाजपमध्ये गेल्यानंतर ते पवित्र होत असतात असा आरोप संजय सावंत यांनी केला आहे. या सरकारची प्रतीकात्मकरित्या अंत्ययात्रा काढली आहे. भविष्यात सरकारच्या भ्रष्टाचाराचे व अशा चुकीचे प्रत्येयाचे प्रकार जर थांबले नाहीतर तर जनता रस्त्यावर उतरेल असेही ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले याप्रसंगी माजी खासदार उन्मेष पाटील, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक करण पवार, महानगर प्रमुख शरद तायडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील, उपमहागर प्रमुख नेता सांगोळे, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाहीर पठाण, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, उपमहानगरप्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, कुसुंबा उपसरपंच प्रमोद घुगे, धरणगाव माजी नगराध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, फिरोज पठाण, शोएब खाटीक, किरण भावसार, निलेश ठाकरे, बाळा कणखरे, विजय बांदल, राहुल पार्क ,विजय राठोड, जैनुद्दीन शेख, लखन सांगळे, संजय सांगळे, शरीफ रंगरेज, कलीम खान, पप्पू तायडे, राकेश माळी, बिरजू शिरसाठ, शरद पाटील, गोलू पाराये, राहुल खवडे,,भगवान धनगर,,गुलाबराव कांबळे,,सचिन चौधरी, ,छगन खडसे,,योगेश पाटील, डॉ. रमाकांत कदम, लोटन सोनवणे, प्रभाकर कोळी, योगेश चौधरी, आबा कोळी, राकेश घुगे, विनायक धर्माधिकारी, राजू जगताप, भीमराव पांडव आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी केले तर आभार उमेश चौधरी यांनी मानले.