---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा ऐरणी गाठली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
कार्यक्रमातील औपचारिकता बाजूला ठेवत कृषिमंत्र्यांनी स्वतः हातात माईक घेतला आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांशी थेट चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्यांचा पाढा वाचला.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील बनावट केळी पिक विमा प्रकरणावरून शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले. प्रशासनाकडून सुरू असलेली कारवाई ही केळी पिक विमा बंद करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर केला.
तसेच, “एकाच वर्षात हजारो बनावट केळी पिक विमाधारक शेतकरी कसे आढळले?” असा थेट सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत लवकरच योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.








