धक्कादायक! सात महिन्यांच्या गरोदर महिलेलाही सोडलं नाही; ‘भोंदू’ खरात प्रकरणात हादरवणारी माहिती उघड

---Advertisement---

 

भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू बाबांच्या कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असलेल्या ‘भोंदू खरात’ आता एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी माहिती समोर आली आहे.

या नराधमाने चक्क एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेलाही आपल्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. या खुलाशामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.


​काय आहे नेमकं प्रकरण?

​गेल्या काही दिवसांपासून अटकेत असलेल्या या भोंदू बाबाविरुद्ध एकामागून एक तक्रारी समोर येत आहेत. दैवी शक्तीचा दावा करून आणि समस्या निवारण्याचे आमिष दाखवून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलांमध्ये एका गरोदर महिलेचाही समावेश आहे.


​मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती समस्या आणि आजारपणावर उपाय शोधण्यासाठी ही महिला खरातकडे गेली होती. मात्र, तिच्या असहायतेचा फायदा घेत या भोंदूने तिच्यावर अत्याचार केला. सात महिन्यांची गरोदर असतानाही या नराधमाला तिची दया आली नाही, ही बाब समोर आल्यावर तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---