---Advertisement---
जळगांव : एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यापासून ते आक्रमक झाले आहे.याच दरम्यान त्यांनी सावदा पोलीस प्रशासनावर तसेच सत्ताधारी नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडून दिली आहे. जळगांव जिल्ह्यातील सावदा परिसरात एका विधवा महिलेवर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. हा गुन्हा एका मोठ्या पदाधिकाऱ्याने केल्याचा दावा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पीडित महिला सावदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती; मात्र तिची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही. इतकंच नव्हे तर संबंधित पोलीस निरीक्षकाने महिलेला धमकावून घरी पाठवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
तक्रार नोंद न केल्याचा आरोप; चौकशीची मागणी अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद न घेणे ही स्वतःमध्ये गंभीर बाब असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत पोलिसांकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. आता या प्रकरणाची सखोल चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









