भुसावळ/धुळे : पैशांचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवून दीड लाख उकळण्यात आले; मात्र पैशांचा पाऊस पडलाच नाही. त्यानंतर दिलेले पैसे परत मागण्याच्या वादातून संशयिताने गोळ्या झाडल्याने दोघे जखमी झाले. हा थरार पळासनेरच्या जंगलात १४ डिसेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास घडला. धुळे गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाईत मध्य प्रदेशातील चौकडीच्या मुसक्या आवळत्या. संशयितांच्या अटकेनंतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
या संशयितांना अटक
गणेश रामदास चौरे (३०), रतीलाल गणपत तायडे (दोघे ५०, ब-हाणपूर, मध्य प्रदेश), अंकित अनिल तिवारी (२५), विशाल करणसिंग कश्यप (दोघे ३९, खंडवा, मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली. यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनात धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, शिरपूर तालुक्याचे निरीक्षक जयपाल हिरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक अमरजित मोरे, संजय पाटील, पवन गवळी, आरीफ पठाण, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार, नितीन दिवसे, मयूर पाटील, संजय सुरसे, शिरपूर तालुक्याचे धनराज गोपाल, इसरार फारूखी, मनोज नेरकर, गुरुदास बडगुजर आर्दीच्या पथकाने केली.
असे आहे प्रकरण
गुलजारसिंग पारसिंग पावरा (बोराडी, ता. शिरपूर) याने पैशांचा पाऊस पाडतो म्हणत गणेश रामदास चौरे यास सांगितल्याने चौरेसह साथीदार शिवा सीताराम पावरा हे पळासनेरच्या जंगलात १४ डिसेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास दाखल झाले. गणेशने दीड लाख रुपये गुलजारसिंगला दिले. मात्र, पैशांचा पाऊस पडलाच नाही. या वेळी दिलेले पैसे परत मागण्यावरून वाद झाला. ५० हजार रुपयेच परत मिळत असल्याचे पाहून वादात अधिक भर पडली. या वेळी संशयित गणेशसोबत असलेल्या एकाने गावठी बनावटीच्या बंदुकीतून गोळी झाडल्याने दोघे जखमी झाले. धुळ्यातील सिद्धेश्वर हॉस्पिटलम ध्ये जखमींना आणल्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदवत कारवाई करीत संशयितांच्या मुसक्या आवळल्या.