महावितरणच्या ‘कपॅसिटी कटिंग’विरोधात सोलर संघटनेचा एल्गार

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव येथे महावितरण कंपनीने लागू केलेल्या ‘कपॅसिटी कटिंग’ निर्णयाविरोधात सोलर संघटना आक्रमक झाली आहे. हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. त्यानंतर महावितरण कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.
महावितरण व राज्य सरकारने लावलेले निर्बंध सोलर उद्योजकांवर अन्याय करणारे असून सौर ऊर्जा क्षेत्राला खिळ बसवणारे असल्याचा आरोप संघटनेने केला. ‘कपॅसिटी कटिंग’मुळे अनेक सोलर प्रकल्प आर्थिक अडचणीत सापडतील तसेच गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे मोठे नुकसान होईल, असा दावा करण्यात आला.
निदर्शनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , राज्य सरकार तसेच Maharashtra State Electricity Distribution Company Limited यांच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
“लावलेले निर्बंध तात्काळ रद्द करा, अन्यथा सोलर संघटनेचे सर्व पदाधिकारी मंत्रालयावर धडक देऊन जाब विचारतील,” असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
सौर ऊर्जा क्षेत्र वाचवण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा निर्धार व्यक्त करत, शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा आणि थेट मंत्रालयावर धडक देण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---