---Advertisement---
शिंदखेडा तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवायला सुरुवात झाली असून यावर उपाययोजना करण्याची गरज ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला करण्यात येत आहे यावर्षी पाऊसमान चांगले न झाल्यामुळे विहिरीना पाहिजे तसे पाणी नाही त्यामुळे गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या गाव विहिरींचे पाणी पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याने यावर शासनाने व प्रशासनाने ठोस असे कार्यवाही करण्याची गरज स्थानिक ग्रामस्थ करतात..
शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू या गावात दर सहा दिवसाने पाणीपुरवठा आता होत असल्याने नागरिकांनी तीव्र अशी नाराजी व्यक्त केली. यासाठी ठोस अशी कार्यवाही ग्रामपंचायत प्रशासनातर्फे कुठलीही कारवाई व नियोजन होत नसल्यामुळे छोट्याशा गावाला पाणीपुरवठा ही जमत नसल्याचे महिला वर्गात तीव्र अशी नाराजी आहे. गावाचा पाणीपुरवठा गाव विहिरीद्वारे केला जात होता, तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने बोरवेल केली होती परंतु त्याला पाहिजे तसा पाणी न लागल्यामुळे तोही प्रयत्न फेल गेला.. गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी पाच वॉल असून चक्रकार पद्धतीने पाच ते सहा दिवसात पाणीपुरवठा होतो त्यामुळे अत्यंत भीषण अशी पाणीटंचाई जाणवत आहे.
सोनशेलू गावाची लोकसंख्या 1400 ते 1500 च्या दरम्यान असून गावासाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी नादुरुस्त आहे सध्या सरपंच पद रिक्त असल्यामुळे त्याचबरोबर प्रशासकाची नियुक्ती होणारा विलंब यामुळे प्रशासनाची टोलवाटोलवी आहॆ. सोनशेलू ची पाणी व्यवस्था पूर्णतः डगमगली असून ठोस अशी कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी फिरावे लागते. गावातील ज्या नागरिकांकडे बैलगाडी आहे ते आपल्या बैलगाडीवर पाण्याचे ड्रम भरून आणून आपली पाण्याची गरज भागवत आहेत ..
मागील पाच सहा महिन्यापासून गावातील पिण्याच्या पाण्याचे संकट असून यापुढील काळात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होणार असून त्यामुळे वेळेवर पाण्याचे नियोजन करण्याची गरज , अथवा विहिरीचे अधिग्रहण करून नागरिकांची पाण्याची गरज भागवावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाकडे करण्यात येत आहे..









