मतदार यादी ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर)जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 70 टक्के मॅपिंग पूर्ण

---Advertisement---

 

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगांतर्गत देशपातळीवर मतदार यादी ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर) कार्यक्रम अंमलबजावणी केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात 11 विधानसभा मतदार संघात बीएलओ स्तरावरून घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेत सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) केले जात आहे. जिल्ह्यात 37 लाख 32हजार 579 मतदारांपैकी आतापर्यत 23 लाख 4 हजार 856 सरासरी 70.86 टक्के मतदारांचे मॅपिंगचे काम पूर्ण झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.


भारत निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर) कार्यक्रम राबवण्यात येत आहे. भविष्यात मतदार यादीवर येणारे संभाव्य आक्षेप कमी करण्यासाठी आणि एक अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक मतदाराने आपले नाव 2002 च्या मतदार यादीतील माहितीसोबत मॅपिंग करणे अत्यंत आवश्यक आहे.


संबधीत बीएलओकडे संपर्क साधा
यापूर्वी 2002 मध्ये ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात आला आहे. सद्यस्थितीत मतदारांनी 2014, 2019 तसेच 2024 च्या यादीनुसार मतदान केले आहे. परंतु, 2002 मध्ये यादीत नसेल, तर आपल्या आई, वडील, आजी किंवा आजोबा यांची वरीलप्रमाणे 2002 ची माहिती आपल्या सबंधीत बीएलओ कडे त्वरित द्यावी. आपल्या भागातील (मतदार केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ) यांच्याशी संपर्क साधा आणि तुमचे आजचे नाव 2002 च्या नावाशी मॅपिंग करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.


वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार म्हणून नोंदणी केल्यानंतर स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच विधानसभा, लोकसभा आदीसाठी मतदान करणे, हा सर्वसामान्य नागरिक मतदारांचा अधिकार आहे. सद्यस्थितीत देशपातळीवर मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) सर्वेक्षण केले जात आहे. यापूर्वी 2002 दरम्यान मतदार यादी सखोल पुनर्रिक्षण सर्वेक्षण (एसआयआर) करण्यात आले आहे.


आई वडील आजी आजोबांच्या मतदान संदर्भ

जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागांतर्गत अकरा मतदार संघात करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणादरम्यान स्थानिक स्तरावर बीएलओ मतदारांकडून माहिती घेत आहेत. यात मतदार यादीतील नावानुसार संबंधीत मतदारानी 2002 पूर्वी मतदान संदर्भात पुरावे देणे आवश्यक आहे. घरातील सदस्य, मुले, मुली अथवा सुना यांची माहितीचा समावेश आहे. यात 2002 पूर्वी आई वडील आजी आजोबा यांच्या मतदानाचा संदर्भात पुरावे नसतील तर हा हक्क कायमचा हिरावला जाऊ शकते.


निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमानुसार आता 2014 च्या मतदार यादीतील नावांचे 2002 च्या यादीशी मंपिंग केले जात आहे. यात ज्यांचे नाव 2002 च्या यादीत सापडणार नाही किंवा जे आवश्यक पुरावे देऊ शकणार नाहीत त्यांचे नाव मतदार यादीतून कमी केले जाण्याची शक्यता आहे.


ही माहिती देणे आवश्यक

या मतदार गणना प्रक्रियेदरम्यान विशेषताः दोन ते पाच वर्षापूर्वी नव्याने लग्न होवून आलेल्या सुनांसाठी कोंडी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात नव्याने लग्न होवून आलेल्या सुनेच्या संदर्भात त्यांच्या आई-वडिलांचे संपूर्ण नाव, लग्नापूर्वीचे पूर्ण नाव, शहर, तालुका, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ नाव, मतदारसंघ क्रमांक, मतदार यादी भाग क्रमांक, 2002 च्या यादीतील अनुक्रमांक क्रमांक आदी माहिती द्यावी. 2024 पूर्वी मतदान केले असेल तर सुनेला आपले नाव मतदार यादीत टिकवण्यासाठी माहेरच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या 2002 च्या नोंदींचा पुरावा द्यावा लागणार असून त्यानुसार ते नव्याने या यादीत समाविष्ट होणार आहेत.


पाचोरा तालुक्यात 1060 दुबार तर 2747 मतदार मयत तर 250 हून अधिक मतदार स्थलांतरीत असल्याचे अनमॅपिंगमधून आढळले आहेत. अशीच स्थिती कमी अधिक प्रमाणात अन्य मतदार संघात असून स्थानिक स्तरावर मतदारांचे मॅपिंग करणेचे काम सुरू आहे. तसेच एप्रिल अखेर ग्रामपातळीवर ग्रामपंचातीअंतर्गत मतदार यादी पडताळणीर मॅपिंग केले जाणार आहे.

मतदार संघ मतदार संख्या झालेले मॅपिंग टक्के
चोपडा 337719 212236 73.50
रावेर 312027 248273 82.00
भुसावळ 317454 176362 64.94
जळगाव शहर 443655 112366 38.77
जळगाव ग्रामीण 345987 210826 71.06
अमळनेर 312247 204362 76.39
एरंडोल 298085 214992 78.79
चाळीसगाव 382724 235052 72.67
पाचोरा 338953 222740 77.12
जामनेर 338407 237132 78.02
मुक्ताईनगर 305341 230515 80.17
एकूण 3732579 2304856 70.86

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---