---Advertisement---
होळी सणानिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या होळी उत्सवासाठी 24 अतिरिक्त विशेष गाड्या धावणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी जाहीर केलेल्या 216 विशेष गाड्यांव्यतिरिक्त आता 24 गाड्यांची भर पडल्याने एकूण 240 होळी विशेष गाड्या मार्गावर धावणार आहेत. विशेषतः मुंबई, पुणे आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस – कानपूर विशेष (8 फेऱ्या)
लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर सेंट्रल दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या धावणार आहेत.
7 मार्च ते 28 मार्च 2026 दरम्यान एलटीटीहून दर शनिवारी गाडी सुटेल, तर 6 मार्च ते 27 मार्च दरम्यान कानपूरहून दर शुक्रवारी परतीची सेवा उपलब्ध असेल.
मुख्य थांबे: भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, फतेहपूर आदी स्थानके.
रचना: वातानुकूलित तृतीय, शयनयान, सामान्य द्वितीय श्रेणी आणि गार्ड ब्रेक व्हॅन.
पुणे – झांसी विशेष (8 फेऱ्या)
पुणे ते वीरांगना लक्ष्मीबाई झांसी दरम्यान 5 मार्च ते 26 मार्च 2026 या कालावधीत दर गुरुवारी विशेष गाडी धावेल. झांसीहून परतीची सेवा दर बुधवारी उपलब्ध असेल.
मुख्य थांबे: दौंड कॉर्ड लाईन, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, विदिशा, बिना, ललितपूर.
रचना: वातानुकूलित द्वितीय व तृतीय, शयनयान, सामान्य द्वितीय आणि गार्ड ब्रेक व्हॅन.
हडपसर – झांसी विशेष (8 फेऱ्या)
हडपसर ते झांसी दरम्यान 8 मार्च ते 29 मार्च 2026 या काळात दर रविवारी विशेष गाडी सुटेल. झांसीहून हडपसरसाठी दर शनिवारी परतीची सेवा असेल.
मुख्य थांबे: दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, बिना.
रचना: वातानुकूलित द्वितीय व तृतीय, शयनयान, सामान्य द्वितीय आणि गार्ड ब्रेक व्हॅन.
होळी सणाच्या काळात उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अतिरिक्त गाड्यांची ही घोषणा प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार असून तिकिटांचे आरक्षण लवकर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.









