---Advertisement---
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युनाइटेड स्टेट्स , इस्राएल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. या तणावपूर्ण परिस्थितीचा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसला आहे. आज बाजार उघडताच BSE सेन्सेक्स तब्बल 1800 अंकांनी घसरला, तर Nifty 50 मध्येही 525 अंकांची मोठी घसरण नोंदवली गेली.
दिवसभरातील व्यवहारादरम्यान ही घसरण आणखी वाढत गेली. सध्या सेन्सेक्स 2400 हून अधिक अंकांनी, तर निफ्टी 750 हून अधिक अंकांनी खाली व्यवहार करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आशियातील प्रमुख बाजारांवरही परिणाम
या युद्धाचा परिणाम केवळ भारतापुरता मर्यादित नसून संपूर्ण आशियाई आणि जागतिक बाजारावर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. आशियातील प्रमुख बाजारांमध्येही मोठी घसरण झाली आहे.
Japan : सुमारे 7% घसरण
South Korea : सुमारे 8% घसरण
Australia : सुमारे 4% घसरण
Singapore : सुमारे 3% घसरण
तसेच United States मधील बाजारातही मोठ्या घसरणीचे संकेत मिळत आहेत.
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ
युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किमतीत मागील आठवड्याच्या तुलनेत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली असून दर 114 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत.
इंधनाचे वाढते दर भारतासारख्या आयातदार देशासाठी महागाई वाढवणारे ठरू शकतात. त्यामुळे पश्चिम आशियातील या घडामोडींवर भारत सरकारचे बारीक लक्ष असून परिस्थितीवर सतत नजर ठेवली जात आहे.









