---Advertisement---

नशिराबादमध्ये विचित्र प्रकार, ‘रिंगण बाहुली’द्वारा नागरिकांमध्ये पसरविली जातेय भीती

---Advertisement---

---Advertisement---

नशिराबाद : मागील काही दिवसांपासून नशिराबाद परिसरात पसरलेल्या एका विचित्र आणि भीतीदायक रिंगण बाहुली प्रकरणाने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी एक वयोवृद्ध महिला रस्त्यावर रिंगण घालून त्यात बाहुली ठेवते, असा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. यासंबंधी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गावात अंधश्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये आणि पालकांमध्ये भीती पसरली आहे.

सदर व्हिडिओमध्ये एका महिलेस रस्त्यावर रिंगण घालून त्यात बाहुली ठेवताना दाखवण्यात आले होते. त्यामुळे ही अघोरी कृत्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. सी. मनोरे स्वतः या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.

कंडारी येथे पकडण्यात आलेली महिला बेडी-भीक मागणारी..

याच पार्श्वभूमीवर कंडारी परिसरात एक महिला नागरिकांना संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आली. तीच महिला नशिराबाद प्रकरणातील असल्याचा नागरिकांचा समज झाला होता. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सदर महिला मंगला बुद्रुक जोशी (रा. शेंगोळा, ता. जामनेर, जि. जळगाव) ही असून ती श्रावण महिन्यात गावोगावी जाऊन “भेट-बेडी” मागत असते. ती रिंगण काढणारी महिला नसून, व्हायरल व्हिडिओमधील महिलेचा तिच्याशी काहीही संबंध नाही, असे नशिराबाद पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मिडियावरील कोणत्याही चुकीच्या व्हिडिओ किंवा फोटो मुळे एखाद्या निरअपराधी व्यक्तीला याची किंमत मोजावी लागेल. तरी आपण चुकीच्या पद्धतीने आहे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून कोणाच्या जीविताची न खेळण्याचा इशारा नशिराबाद पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.

नशिराबाद येथील ‘ती’ महिलाही निरपराध

या प्रकरणात नशिराबादमधील एका भाडेकरू महिलेलाही संशयाच्या भोवऱ्यात ओढण्यात आले होते. मात्र ती महिला चतुर्मासानिमित्त पंढरपूर येथे गेल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे यांनी दिली असून, तिच्यावरचा संशय फोल ठरला आहे. माजी सरपंच पंकज महाजन यांनीही नागरिकांना आवाहन केले होते की, कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

तपासादरम्यान पोलिसांना गावातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळाले असून, त्यामध्येही कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. तरी देखील पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू ठेवला आहे.

तर नशिराबाद पोलीस करणार कारवाई

या संपूर्ण प्रकरणामुळे गावकऱ्यांमध्ये भीती व संभ्रम निर्माण झाला आहे. नागरिकांनी शांतता व संयम राखावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच अशा अफवांच्या आहारी न जाता प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करताना पडताळणी करावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---