जळगावात आयटीआय विद्यार्थ्याची आत्महत्या; इन्स्टाग्रामवरील ‘शेवटचे स्टेटस’ चर्चेत

---Advertisement---

 

जळगाव : शहरातील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहित समाधान पवार (रा. निंभोरा, ता. धरणगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर ठेवलेले स्टेटस सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


घटना कशी घडली?
रोहित हा सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहत होता. १७ मार्च रोजी सकाळी त्याचे वडील त्याला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी “पोटात दुखत असल्याने आज कॉलेजला गेलो नाही” असे सांगून त्याने वडिलांना परत पाठवले. मात्र, काही तासांनंतर त्याने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.


दुपारी सुमारे ३ वाजता त्याचा रूममेट सागर शिरोळे कॉलेजवरून परतला असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर रोहितला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


इन्स्टाग्राम स्टेटसने निर्माण केला प्रश्नचिन्ह
आत्महत्येपूर्वी रोहितने इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवत लिहिले होते की, “अकाउंटमध्ये काही समस्या येत असल्याने आजपासून अकाउंट बंद करत आहे. कोणाला काही वाईट मेसेज गेले असतील तर माफ करा.” या संदेशामुळे तो मानसिक तणावाखाली होता का, किंवा कोणत्यातरी दबावाखाली होता का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.


पोलीस तपास सुरू
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, रोहितने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून त्याचा मोबाईल, सोशल मीडिया आणि मित्रपरिवाराची चौकशी केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---