जळगाव : यावल तालुक्यातील एका गॅरेजच्या मागील शेतात झोपडीमध्ये विवाहितेने गळफास घेतला. ही घटना गुरुवार, १९ रोजी उघड झाली. यानतंर त्या विवाहितेला यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करुन तिला मृत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फैजपूर शहरातून रावेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शहराबाहेर असणाऱ्या गॅरेजच्या मागे असलेल्या शेतात झोपडी आहे. या झोपडीत गीता प्रताप बारेला (वय ३८) ही विवाहिता परिवारासह राहते. गुरूवार १९ रोजी विवाहितेने गळफास घेतल्याचे निदर्शनास आली. याबाबतची माहिती फैजपूर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी सहायक पोलिस निरिक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमजद खान पठाण, ज्ञानेश्वर चौधरी यांनी विवाहितेस तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी विवाहितेची तपासणी करून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी प्रताप बारेला यांच्या फीर्यादीवरुन फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार अनिल पाटील करीत आहेत. मयत महिलेच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे. ती मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर तालुक्यातील भोलाणे येथील मुळची रहिवासी असुन पतीसह शेतात काम करून उदरनिर्वाह करीत होती.